T20 World Cup 2022 Match Live Streaming : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आता सुपर 12 च्या ग्रुप 1 मधील अखेरचा सामना रंगणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका ((England vs Sri Lanka) या सामन्यानंतर केवळ ग्रुप 2 मधीस तीन साखळी सामने होणार असून त्यानंतर सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान आतापर्यंत ग्रुप 1 मधून न्यूझीलंडचा संघ अप्रतिम खेळ करत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर आयर्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका या संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची चुरस आहे. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 7 गुण असून आता इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध जिंकल्यास त्यांच्याकडेही 7 गुण येतील. पण इंग्लंडचा नेटरन रेट चांगला असल्याने ते नक्कीच सेमीफायनलमध्ये जातील. तर सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी होणार सामना?
भारतीय वेळेनुसार आजचा इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
आजचा हा इंग्लंड विरुद्ध श्रीलंकाऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
श्रीलंका संघ
दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वनिन्दु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा (फिटनेस टेस्ट बाकी), लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन
इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, अॅलेक्स हेल्स.
राखीव खेळाडू : लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.
हे देखील वाचा-