Australia New Jersey: ऑस्ट्रेलियात येत्या पुढील महिन्यापासून टी-20 विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup) सुरूवात होणार आहे. दरम्यान, यजमान ऑस्ट्रेलियानं टी-20 विश्वचषक 2022 साठी आपली नवीन स्वदेशी जर्सी लाँच केलीय.आरोन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वाखाली गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्वदेशी-थीम असलेली जर्सी घालून मैदानात उतरेल. 


नव्या लूकमध्ये दिसणार ऑस्ट्रेलियाचा संघ
ऑस्ट्रेलियाचा संघ एखाद्या मोठ्या स्पर्धेत प्रथम राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारी जर्सी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाची नवी जर्सी अधिक आकर्षित दिसत आहे. या पिवळ्या रंगाच्या जर्सीवर हिरव्या रंगाची डिझाइन करण्यात आलीय. यामुळं टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघाला नव्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.


दिनेश कार्तिकची मजेदार कमेंट
ईएसपीए क्रिकइन्फोनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलंय, ज्यात मिचेल स्टार्क , ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेजलवुड हे टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियानं लॉन्च केलेल्या नव्या जर्सीत दिसत आहेत. हे तिन्ही खेळाडू आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. यावर्षी दिनेश कार्तिकही बंगळुरूच्या संघाचा भाग होता. दरम्यान, दिनेश कार्तिकनं या फोटोवर केलेली कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.


ट्वीट- 
https://twitter.com/cricketcomau/status/1569825830947389442


दिनेश कार्तिकचं ट्वीट-


https://twitter.com/DineshKarthik/status/1569978020089438209


टी-20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, अॅडम झम्पा, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार).


कधी कुठे रंगाणार आगामी टी-20 विश्वचषकातील सामने?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


हे देखील वाचा-