Ishwar Pandey Allegations Against Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) गणना जगभरातील उत्कृष्ट कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीनं अनेक खेळाडूंना भारतीय संघात संधी देऊन त्याचं करिअर उजळून टाकलंय. तसेच मिळालेल्या संधीचं सोनं करत अनेक खेळाडूंनी जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. याचदरम्यान कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग राहिलेला वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेनं (Ishwar Pandey) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तसेच धोनीनं भारतीय संघासाठी एक सामना खेळण्याची संधी दिली असती तर त्याचं करियर काही वेगळं असतं, असा आरोप पांडेकडून करण्यात आलाय.
ईश्वर पांडेला भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही. दरम्यान, 2014 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, या दौऱ्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाकडून खेळण्याच्या प्रतिक्षेत असेलेल्या पांडेनं काल अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेताला. पांडेनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय.
धोनीबाबत ईश्वर पांडे काय म्हणाला?
दैनिक जागरणशी बोलताना ईश्वर पांडे म्हणाला की, "महेंद्रसिंग धोनीने मला संधी दिली असती तर कदाचित माझ करिअर काही वेगळं असतं. तेव्हा मी 23-24 वर्षांचा होतो आणि माझा फिटनेसही खूप चांगला होता. जर धोनी भाईनं मला भारतीय संघात संधी दिली असती तर मी माझ्या देशासाठी चांगली कामगिरी केली असती आणि माझ करिअर खूप वेगळं असतं."
ईश्वरचंद पांडेची इन्स्टाग्राम पोस्ट-
ईश्वरचंद पांडेची कारकिर्द
ईश्वरचंद पांडेनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 75 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मध्य प्रदेशच्या संघाचं प्रतिनिधित्त्व केलंय. या 75 सामन्यांमध्ये त्याने 263 विकेट्स घेतल्या आहेत.तसेच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. आयपीएलमध्ये त्यानं 25 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं चेन्नईव्यतिरिक्त पुणे वॉरियर्स आणि रायझिंग सुपर जायंट्स संघाचंही प्रतिनिधित्व केलंय.
हे देखील वाचा-