T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं चार धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफगाणिस्तानसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघानं 164 धावा केल्या. अखेरच्या षटकात अफगाणिस्तानच्या संघाला 22 धावांची गरज असताना स्टार ऑलराऊंडर राशीद खाननं (Rashid Khan) एकाकी झुंज देत ऑस्ट्रेलियाची धाकधूक वाढवली. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. 

दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाला अखेरच्या षटकात 22 धावांची गरज असताना कर्णधार मॅथ्यू वेडनं चेंडू मार्कस स्टॉयनिसकडं चेंडू सोपवला. या षटकातील पहिला चेंडू राशीदनं निर्धाव खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून अफगाणिस्तानच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या. मात्र, तिसरा चेंडू निर्धाव टाकत स्टॉयनिसनं कमबॅक केलं. चौथ्या चेंडूवर षटकार मारत राशीदनंही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर राशीदनं उत्तुंग फटका मारला. मात्र, हा चेंडू मैदानातच पडला. या चेंडूवर राशीदनं दोन धावा काढल्या. यानंतर सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकला फक्त औपचारिकता म्हणून अखेरचा चेंडू टाकण्यात आला. या चेंडूवर राशीदनं चौकार मारला. 

ऑस्ट्रेलिया- अफगाणिस्तान यांच्यातील अखेरचं षटक

19.1: दर्विश रसूली बाद19.2: राशीनं चौकार मारला19.3: निर्धाव चेंडू19.4: राशीदचा षटकार19.5: राशीदनं दोन धावा घेतल्या19.6: राशीदचा चौकार

इंग्लंड- अफगाणिस्तान सामन्यावर सर्वांचं लक्षऑस्ट्रेलियाच्या संघानं अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला असला तरी सेमीफायनचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना इंग्लंड- श्रीलंका यांच्यातील सामन्यावर अवलंबून राहवं लागणार आहे. श्रीलंकेच्या संघानं इंग्लंडचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमधील स्थान पक्क होईल.

सुपर-12 ग्रुप 1 ची गुणतालिका-

क्रमांकसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनेट रनरेट
1न्यूझीलंड53117+2.113
2ऑस्ट्रेलिया53117-0.173
3इंग्लंड42115+0.547
4श्रीलंका42204-0.457
5आयर्लंड51312-1.165
6अफगाणिस्तान50222-0.718

 

हे देखील वाचा-