Tim Southee Record : न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साउदीने (Tim Southee) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. साउदीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) आयर्लंड विरुद्ध न्यूझीलंड (IRE vs NZ) सामन्यात त्याने दोन विकेट्स घेत हा रेकॉर्ड नावावर केला आहे. साउदीने 104 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 128 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन याला मागे टाकत हा रेकॉर्ड नावावर केला आहे.


न्यूझीलंडनं नुकत्याच झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 35 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आधी दमदार फलंदाजी करत 185 धावा न्यूझीलंडने केल्या, त्यानंतर मात्र भेदक गोलंदाजी करत अवघ्या 150 धावांत आयर्लंडला रोखलं. यावेळी महत्त्वाची कामगिरी भारतीय गोलंदाजांनी केली असून स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याने सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्यात बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला मागे टाकलं आहे. साउदीने आपल्या टी-20 कारकिर्दीत 104 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 128 विकेट्स आहेत. तसंच, शाकिब अल हसन त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने एकूण 108 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 127 विकेट्स आहेत.


आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज



  1. टीम साउदी (न्यूझीलंड) – 104 सामने– 128 विकेट्स

  2. शाकिब अल हसन (बांगलादेश) – 108 सामने– 127 विकेट्स

  3. राशिद खान (अफगाणिस्तान) – 73 सामने– 121 विकेट्स

  4. ईश सोढी (न्यूझीलंड) – 85 सामने– 109 विकेट्स

  5. लसिथ मलिंगा (श्रीलंका) – 84 सामने– 107 विकेट्स


न्यूझीलंड 35 धावांनी विजयी


वर्ल्डकपच्या 37 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं आयर्लंडचा (New Zealand vs Ireland) 35 धावांनी पराभव करत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. या स्पर्धेत सेमीफायनलचं स्थान गाठणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघानं न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात आयर्लंडसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 150 धावापर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात झंझावाती अर्धशतकीय खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) सामनीवीर म्हणून गौरवण्यात आलं.


हे देखील वाचा-