ENG vs NZ live updates : वर्ल्डकप महासंग्राम सुरु; इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

न्यूझीलंडचा संघ दोनवेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी चॅम्पियन होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, इंग्लंड एकदिवसीय तसेच टी-20 मध्ये विश्वविजेता आहे. त्यामुळे इंग्लंडचे पारडे जड असेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Oct 2023 08:37 PM
न्यूझीलंडचा इंग्लंडवर नऊ विकेटने विजय

न्यूझीलंडचा इंग्लंडवर नऊ विकेटने विजय... सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडची बाजी

न्यूझीलंडच्या 250 धावा

न्यूझीलंडने 250 धावांचा टप्पा पार केला आहे. कॉन्वे आणि रचित शतकी खेळी केली.

विजय न्यूझीलंडच्या दृष्टीक्षेपात

इंग्लंडने दिलेल्या 283 धावांचा सामना करताना न्यूझीलंड संघाने दमदार फलंदाजी केली. आधी गोलंदाजांनी रोखले, त्यानंतर फलंदाजांनी चोपले. न्यूझीलंडला विजयासाठी 96 चेंडूत 38 धावांची गरज आहे. न्यूझीलंडच्या हातात नऊ विकेट आहेत.

कॉन्वेनंतर रचित रविंद्र याचे शतक

कॉनवे याने विश्वचषकात शतक ठोकले. रविंद्र याचे विश्वचषकातील पहिले शतक होय. रविंद्र याने अवघ्या 82 चेंडूचा सामना करत शतक ठोकलेय.

डेवॉन कॉनवेची शतकी खेळी

सलामीच्याच सामन्यात डेवेन कॉनवे याने शतक ठोकले आहे. कॉनवेने 83 चेंडूत शतक ठोकले.. 

न्यूझीलंडच्या फलंदाजांची दादागिरी

रचित रविंद्र आणि डेवेन कॉनवे यांनी इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 165 धावांची भागिदारी झाली आहे. कॉनवे 90 तर रचित 84 धावांवर खेळत आहे.

न्यूझीलंडची दमदार सुरुवात; 16 षटकात 1 बाद 130 धावांपर्यंत मजल

न्यूझीलंडने 283 धावांचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली आहे. 16 षटकांत 1 बाद 130 धावापर्यंत मजल न्यूझीलंडने मारली आहे. काॅन्वे आणि रवींद्र मैदानात आहेत. 

कॉनवे -रविंद्र यांनी डाव सावरला

10 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर डेवेन कॉनवे आणि रविंद्र यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला आहे. दोघांनीही वादळी फलंदाजी करत विजयाकडे वाटचाल केली आहे. न्यूझीलंड 10 षटकात एक बाद 85 धावा 

न्यूझीलंडला पहिला धक्का

सॅम करन याने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. विल यंग याला शून्यावर बाद करत सॅम करन याने दमदार सुरुवात केली.

न्यीझीलंडला विजयासाठी 283 धावांचे आव्हान

विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 282 धावांपर्यंत मजल मारली आहे. इग्लंडकडून जो रुट याने चिवट फलंदाजी करत 77 धावांचे योगदान दिले. तर न्यूझीलंडकडून मॅट हेनरी याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 282 धावांचे आव्हान आहे.

इंग्लंडची 282 धावांपर्यंत मजल

इंग्लंडची 282 धावांपर्यंत मजल

इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली

261 धावांत इंग्लंडने नऊ फलंदाज गमावले आहेत

इंग्लंडला सातवा धक्का

चिवट फलंदाजी करणारा जो रुट तंबूत परतला आहे. ग्लेन फिलिप्स याने रुटला बाद करत इंग्लंडला सातवा धक्का दिला आहे.

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला. लियाम लिव्हिंगस्टोन 20 धावांवर बाद

इंग्लंडचे द्विशतक

 


जो रुटच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने 200 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंड 35 षटकात पाच बाद 205 धावा.

इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत 

चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार जोस बटलर बाद झाला. हेनरीने बटलरना 43 धावांवर बाद केले. इंग्लंड 33 षटकात पाच बाद 188 धावा.

जो रुटचे दमदार अर्धशतक

इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली असताना जो रुट याने संयमी फलंदाजी केली. रुट याने 58 चेंडूत अर्धशतक ठोकले. इंग्लंड 4 बाद 171 धावा.

इंग्लंडच्या 150 धावा

वादळी सुरुवातीनंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली आहे. इंग्लंडने 27 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 150 धावांपर्यंत मजल मारली आहे. जो रुट 47 धावांवर खेळत आहे.

इंग्लंडला आणखी एक धक्का

मोईन अली याला बाद करत ग्लेन फिलिप्स याने इंग्लंडला चौथा धक्का दिला आहे. मोईन अली 11 धावांवर बाद झाला. इंग्लंड 4 बाद 123 धावा.

इंग्लंडचे शतक फलकावर

वादळी सुरुवातीनंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली आहे. 113 धावांत इंग्लंडचे तीन फलंदाज तंबूत परतले आहेत. बेअरस्टो 33, मलान 14 आणि हॅरी ब्रूक 25 धावा काढून बाद झाले आहेत. जो रुट आणि मोईन अली मैदानात आहेत. 

इंग्लंडला तिसरा धक्का

रविंद्र याने हॅरी ब्रूकला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. हॅरी ब्रूक 25 धावां काढून तंबूत परतला. 

इंग्लंडला दुसरा धक्का

डेविड मलान याच्यानंतर जॉनी बेअर्स्टोही बाद झाला. मिचेल सँटनरने त्याला 33 धावांवर बाद केले.

इंग्लंडची 10 षटकांत 1 बाद 51 धावापर्यंत मजल; ज्यो रुट आणि जाॅनी बेअरस्टाॅ मैदानात

इंग्लंडची 10 षटकांत 1 बाद 51 धावापर्यंत मजल; ज्यो रुट आणि जाॅनी बेअरस्टाॅ मैदानात 


नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी पाचारण केलेल्या इंग्लंडने 10 षटकांत 1 बाद 51 अशी मजल मारली आहे. सलामीवीर मलान 14 धावांवर बाद झाला. ज्यो रुट आणि बेअरस्टाॅ मैदानात आहेत. 

जीवदान मिळूनही सलामीवीर मलान अपयशी; 14 धावांवर हेन्रीनं केली शिकार

जीवदान मिळूनही सलामीवीर मलान अपयशी; 14 धावांवर हेन्रीनं केली शिकार


इंग्लंडला पहिला हादरा बसला आहे. सलामीवीर मलानला जीवदान मिळूनही त्याला संधीचे सोनं करता आलं नाही. त्याला आठव्या षटकात हेन्रीने बादं केलं. त्यामुळे इंग्लंडची 8 षटकात 1 बाद 40 अशी स्थिती आहे. 

इंग्लंडची चांगली सुरुवात, 7 षटकांत नाबाद 39 धावापर्यंत मजल, मलानला जीवदान

इंग्लंडची चांगली सुरुवात, 7 षटकांत नाबाद  39 धावापर्यंत मजल, मलानला जीवदान 


न्यूझीलंड टाॅस जिंकून इंग्लंडला फलंदाजी दिली आहे. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना चांगली सुरुवात करून दिली आहे. इंग्लंडने 7 षटकांत नाबाद 39 धावापर्यंत मजल मारली आहे. मलानला सातव्या षटकात जीवदान मिळाले. 

दोन्ही संघाची अशी आहे प्लेईंग 11

World cup 2023 England vs New Zealand live updates :  इंग्लंड (अंतिम 11) : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड


न्यूझीलंड (अंतिम 11) : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट

इंग्लंडचे पारडे जड असेल

World cup 2023 England vs New Zealand live updates :  न्यूझीलंडचा संघ दोनवेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी चॅम्पियन होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, इंग्लंड एकदिवसीय तसेच टी-20 मध्ये विश्वविजेता आहे. त्यामुळे इंग्लंडचे पारडे जड असेल.

पार्श्वभूमी

World cup 2023 : आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. गतविजेत्या इंग्लंड (England) आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड (New Zealand) संघांमधल्या सामन्यानं या विश्वचषकाची लढाई सुरु झाली. न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.