Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने हट्टी असतात. हे लोक नेहमी स्वत:चंच म्हणणं खरं करतात, समोरच्याचं ऐकून घेण्याची ताकद त्यांच्यात नसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य असल्याने त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव असतो. या व्यक्तींबद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
मूलांक 1 चे लोक हे स्वत:लाच शहाणे समजतात. हे लोक ओव्हरस्मार्ट असतात. जगातील सर्व गोष्टी जणू फक्त आपल्यालाच माहिती असल्यासारखं ते वावरतात.
हे लोक नेहमी स्वत:चंच म्हणणं खरं करतात, मूलांक 1 च्या लोकांमध्ये श्रवण क्षमता कमी असते, ते दुसऱ्यांचं जास्त ऐकून घेऊ शकत नाही. मूलांक 1 चे लोक स्वभावाने हट्टी देखील असतात.
मूलांक 1 चे लोक फार गर्विष्ठ असतात. ते नेहमी ताठ मानेने चालतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात.
आपणच शहाणे आणि समोरचा वेंधळा असा समज त्यांचा असतो. हे लोक नेहमी इतरांवर टीका करतात, पण आतल्या आत या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात आणि त्यांच्या टीमचं नेतृत्व देखील करतात.
हे लोक धाडसी असतात, शिवाय अतिशय शिस्तबद्ध असतात आणि या गुणामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जातात, परंतु त्यांच्या दृढनिश्चयाने आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करतात.
हे लोक इलेक्ट्रॉनिक, फॉरेन कंपनी, संशोधन कार्य, विद्युत संबंधित व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ते काम करतात आणि तिथे प्रगती साधतात. हे लोक कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही यश मिळवतात. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)