टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा मात दिली. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला साऊदम्पटनमध्ये अफगानिस्तान विरोधात होणार आहे. मात्र या संघविरोधात तयारीच्या आधी टीम इंडियाला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे.
भारतीय संघाने गेल्या 12 दिवसात तीन सामने खेळले आहेत.तर न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाने चार पैकी तीन सामने जिंकत 6 आणि रद्द झालेल्या सामन्याचा एक असे 7 अंक कमावत गुणतालिकेत तिसऱ्या नंबरवर कूच केली आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात विजयी परंपरा कायम ठेवत विश्वचषकात सातव्यांदा पराभव केला. या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला. याा सामन्यात रोहितने 140 धावांची दमदार खेळी उभारली होती. त्याला लोकेश राहुलने 57 धावांची तर विराट कोहलीने 77 धावांची महत्वाची खेळी करत साथ दिली होती.