सातारा : खासदार उदयनराजेंच निवडणुकीनंतरच वागणं बदललं आहे. ते माझ्या मतदार संघात कुरघोड्या करत आहेत, असा आरोप सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. खासदारांच्या वागणुकीचा पाढा पक्षश्रेष्ठींकडे वाचला असून त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटत असतो असं सांगून पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचा दावा देखील आमदार शिवेंद्रराजेंनी केला आहे.

नाईक निंबाळकर आणि उदयनराजे या दोघांच्या वादात माझा संबध नाही, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.  लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात कुरघोड्या सुरु आहेत. याबाबत मी पक्षश्रेष्ठींना सांगितले जाते. वेळेच लक्ष घाला, माझे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. रामराजेंसोबत माझ कसलंही सेटिंग नाही, माझ सेटिंग साताऱ्यातील मतदारांशी, जनतेशी सेटिंग आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही आमदार म्हणून जो शब्द दिला तो आम्ही पाळला आहे. त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळावा. उदयनराजेंचं निवडणुकीनंतर वागणं बदललं आहे. त्यांच्या कुरघोड्या ह्या आम्हाला काही नवीन नाहीत, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

मी दबाव टाकून काम करणारा नाही आणि माझे राजकारणावर घर चालत नाही. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही. शशिकांत शिंदेंना घेऊन त्यांच्या भावाला जावळी मतदार संघात फिरवलं जातंय.  आम्ही पक्षासोबत प्रामाणिक काम केले आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, साताऱ्यातील प्रलंबित कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो.