World Carrom Championship 2022: महाराष्ट्राच्या (Maharashtra) संदीप दिवेनं (Sandeep Dive) कॅरमचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. मलेशियात झालेल्या जागतिक कॅरम स्पर्धेत त्यानं पुरुष एकेरीचं (Men's Singles)सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संदीप दिवेनं भारताच्या अब्दुल रेहमानवर 1-25, 25-29, 25-22 अशी मात केली.
भारताच्या रश्मीकुमारीनं महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तिनं अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या काजलकुमारीचा 25-20, 25-16 असा पराभव केला. भारतानं पुरुष आणि महिला गटाचं सांघिक सुवर्णपदक जिंकलं. भारतीय पुरुषांनी श्रीलंकेचा, तर भारतीय महिलांनी अमेरिकेचा 3-0 असाच धुव्वा उडवला. स्विस लीग गटात महाराष्ट्राच्या मोहम्मद घुफ्राननं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.
पुरूष दुहेरीच्या सामन्यात अयपश
पुरूष दुहेरीत भारताच्या प्रशांत मोरे आणि अब्दुल रेहमान जोडीनं अंतिम सामन्यात भारताच्या के. श्रीनिवास- संदीप दिवे जोडीला पराभूत केलं. या सामन्यात के.श्रीनिवास- संदीप दिवे जोडीला 0-25, 25-23 आणि 25-15 असा पराभव स्वीकारावा लागला.
जागतिक कॅरम स्पर्धेत 18 देशांचा सहभाग
स्विस लीग गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील महम्मद घुफ्राननं 8 सामने सलग जिंकत 16 गुण मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर प्रत्येकी 14 गुण मिळविलेल्या युएईचा सुफियान चिकतेनं रौप्य पदक तर श्रीलंकेच्या शाहिद हिलमीनं कांस्य पदक पटकाविलं. यजमान मलेशियासाहित भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदिवज, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, पोलंड, दक्षिण कोरिया, यू.ई, फ्रान्स, सिंगापूर, सर्बिया, कतार, इटली अशा एकूण 18 देशांनी सहभाग या स्पर्धेत भाग घेतला होता.
हे देखील वाचा-