Wimbledon 2022: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवणारी  सेरेना विल्यम्सला (Serena Williams) विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडली. विम्बल्डन 2020 च्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत फ्रान्सच्या हार्मनी टॅनविरुद्ध (Harmony Tan) विल्यम्सला  7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव स्वीकारावा लागला.  40 वर्षीय सेरेनानं 364 दिवसांनंतर महिला एकेरीच्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. 


विम्बल्डनमध्ये जागतिक क्रमवारीत 115 व्या स्थानावर पदार्पण करणाऱ्या फ्रान्सच्या हार्मोनी टेनविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात तिला अखेर 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव पत्करावा लागला. गुरुवारी दुसऱ्या फेरीत टेनचा सामना 32व्या मानांकित स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोशी होईल, जिनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या क्रिस्टीना मॅकहेलचा 6-2, 6-1 असा पराभव केलाय.


तब्बल 364 दिवसानंतर  सेरेना विल्यम्सची मैदानात एन्ट्री
सेरेनाने तिचा शेवटचा एकेरी सामना गेल्या वर्षी 29 जून रोजी विम्बल्डनमध्ये खेळला होता, पण पहिल्या सेटमध्येच दुखापतीमुळे ती बाहेर पडली होती. विम्बल्डनमध्ये सात वेळा माजी चॅम्पियन राहिलेल्या 40 वर्षीय सेरेनाने विजयाची नोंद करताना दोन गुणांची प्रगती केली. विल्यम्सनं सहा वर्षांपूर्वी तिच्या सात विम्बल्डन एकेरी विजेतेपदांपैकी शेवटचे विजेतेपद जिंकलें.  पण 2018 आणि 2019 मध्ये तिला फक्त अंतिम फेरीत प्रवेश करता आला.


सरेना विल्यमन्सविरुद्ध विजयानंतर टॅन काय म्हणाली?
"सरेना विल्यमन्सविरुद्ध विजयानंतर मी खूप भावूक झाले. सरेना विल्यमन्स एक सुपरस्टार खेळाडू आहे. मी लहान असताना तिला टीव्हीवर खेळताना पाहायचे. जेव्हा ती प्रत्यक्ष माझ्यासमोर आली. तेव्ही खरोखर मी घाबरले. ती उत्कृष्ट खेळाडू आहे. तिच्याविरुद्ध एक- दोन सेट जिंकता आलं तरी माझ्यासाठी खूप मोठं आहे, अशा विचारानं मी खेळाला सुरुवात केली", असं हार्मनी टॅन म्हणाली. 


हे देखील वाचा-