Wimbledon 2022: विम्बल्डन 2022 च्या उपांत्य फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) ब्रिटेनच्या कॅमरून नॉरीला (Cameron Norrie) पराभूत केलं. या विजयासह जोकोविचनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तो सर्वाधिक वेळा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये धडक देणारा खेळाडू ठरलाय. जोकोविचनं 32 वेळा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये एन्ट्री केलीय. या कामगिरीसह त्यानं रोजर फेडररला (Roger Federer) मागं टाकलंय. रॉजर फेडररनं 31 वेळा वेळा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. 

Continues below advertisement


जोकोविचची नॉरीविरुद्ध कडवी झुंज
विम्बल्डन 2022 च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पहिल्या मानांकित जोकोविचला नवव्या मानांकित नॉरीविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. या सामन्यातील पहिला सेट मध्ये नॉरीनं जोकोविचचा  2-6 असा पराभव केला. मात्र, पुढील तीन सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करत नॉरीचा 6-3, 6-2 आणि 6-4 असा पराभव करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. 


 नदालचा विक्रम मोडण्यापासून जोकोविच दोन ग्रँडस्लॅम दूर 
जोकोविचनं आतापर्यंत सहा वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलंय. त्यानं मागील तीन वेळा विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. जोकोविचच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या शर्यतीत तो फेडररसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत राफेल नदाल अव्वल स्थानी आहे. नदालनं आतापर्यंत 22 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. नदालचा विक्रम मोडण्यापासून जोकोविच दोन ग्रँडस्लॅम दूर आहे.


विम्बल्डन 2022 च्या अंतिम फेरीत जोकोविच किर्गिओसशी भिडणार
विम्बल्डन 220 च्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन खेळाडू किर्गिओस याच्याशी भिडणार आहे. महत्वाचं म्हणजे, दुखापतीमुळं राफेल नदालनं विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली. त्यानंतर किर्गिओसला उपांत्य फेरीत वॉक ओव्हर मिळाला होता.  ज्यामुळं किर्गिओसला उपांत्य फेरीचा सामना न खेळताच अंतिम फेरीत स्थान मिळालं आहे. 


हे देखील वाचा-