Wimbledon 2022 Men’s Single Final : विम्बल्डन 2022 (Wimbledon 2022) या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेत आज पुरुष एकेरीतील अंतिम सामना पार पडणार आहे. यावेळी सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचं आव्हान असणार आहे. नोवाकने ब्रिटेनच्या कॅमरून नॉरीला (Cameron Norrie) पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. आता काही वेळातच म्हणजेच भारतीय वेळेनुसार 6 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होणार आहे.


हा अंतिम सामना विम्बल्डनच्या सेंटर कोर्ट ऑफ ऑल द इंग्लंड क्लब (Centre Court of the All England Club, Wimbledon) याठिकाणी पार पडणार आहे. हा सामना स्टार स्पोर्टस् नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच ऑनलाईन सामना पाहू इच्छिनाऱ्यांना या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टार अॅपवर पाहता येणार आहे.


जोकोविचकडे इतिहास रचण्याची संधी


जोकोविचनं मागील तीन वेळा सलग विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. विम्बल्डन 2022 च्या स्पर्धेतील अंतिम जिंकल्यास जोकोविच सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरेल.  तसेच जोकोविचच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद केली जाईल. रॉजर फेडररनं आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जिंकली आहेत.


महिला एकेरीत एलेना रिबाकिना विजयी


विम्बल्डन टूर्नांमेंटमध्ये (Wimbledon 2022) महिला गटात कझाकिस्तानच्या (kazakhstan) एलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिने ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरला (Ons Jabeur) मात देत विजय मिळवला आहे. चुरशीच्या झालेल्या सामन्यात एलेनाने (Elena Rybakina) ओन्स जेबुरला 3-6, 6-2 आणि 6-2 अशा तीन सेट्समध्ये पराभूत करत विम्बल्डन महिला एकेरीचे (wimbledon 2022 Women singles) विजेतेपद पटकावले आहे. 23 वर्षाच्या वयात एलेनाने हा खिताब पटकावल्यामुळे संपूर्ण टेनिस जगतात तिचे कौतुक होत आहे.विशेष म्हणजे कझाकिस्तानकडून हा खिताब पहिल्यांदाच कोणत्यातरी खेळाडूने मिळवला आहे. 


हे देखील वाचा-