Ind vs SA, 2 Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 198 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे आधीच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचं आव्हान ठेवलं आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अप्रतिम शतक झळकावल्यामुळेच भारत हे आव्हान देऊ शकला आहे. 


आतापर्यंत सामन्यात...


सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला.ज्यानंतर सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आफ्रिकेचे पाच गडी बाद केले. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करत नऊ गडी तंबूत धाडले. यात बुमराहने 4, शमीने 2 आणि यादवने 2 तर शार्दूलने एक विकेट घेतली. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावा केल्या. ज्यामुळे आफ्रिका 210 धावाच करु शकले. 


पंतचं अप्रतिम शतक


भारताने दुसऱ्या डावात पंतच्या शतकाच्या मदतीने आफ्रिकेला 212 धावांचे आव्हान दिले आहे. पंतशिवाय इतर सर्व फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. कोहलीही 29 धावांवर बाद झाला. पण पंतने एकहाती मोर्चा सांभाळत 133 चेंडूत हे शतक झळकावलं आहे. त्याने या डावात 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर आता दक्षिण आफ्रिकेत पंतने हे शतक झळकावल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे. पंतने पुन्हा एकदा त्याच्या एकाकी खेळीच्या जोरावर भारताचा महत्त्वाच्या सामन्यात एक आशेचा किरण दाखवून दिला आहे.


हे देखील वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha