IND vs SA 3rd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अप्रतिम अशी एकहाती झुंज देत भारताचा डाव सावरला आहेच. शिवाय एक धडाकेबाज असं शतकही झळकावलं आहे. पंतच्या शतकामुळे भारत दुसऱ्या डावात 198 धावा करत 211 धावांची आघाडी घेऊ शकला आहे. पंतच्या या शतकाची सर्वत्र कौतुक होत आहे. 


पंतने 133 चेंडूत हे शतक झळकावलं आहे. त्याने या डावात 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर आता दक्षिण आफ्रिकेत पंतने हे शतक झळकावल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे. पंतने पुन्हा एकदा त्याच्या एकाकी खेळीच्या जोरावर भारताचा महत्त्वाच्या सामन्यात एक आशेचा किरण दाखवून दिला आहे.


 


भारताला इतिहास रचण्याची संधी



भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही


हे देखील वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha