Ind vs SA, 2nd Innings Highlights: केपटाऊनच्या मैदानात सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने आपली बाजू भक्कम केली आहे. त्यांनी भारताला दुसऱ्या डावात डाव 198 धावांवर सर्वबाद करत 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशीच 101 धावा देखील स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे त्यांना केवळ 111 धावांची गरज असून हातात 8 विकेट्सही आहेत.


भारताने पंतच्या शतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात 198 धावा केल्या. ज्यामुळे आधीची आघाडी मिळवून आफ्रिकेसमोर 212 धावांचे आव्हानात्मक लक्ष्यही ठेवले. पण आफ्रिकेचा सलामीवीर मार्करम बाद होताच एल्गार आणि पीटरसन यांनी एक अप्रतिम भागिदारी रचत भारतीय गोलंदाजांना चांगलाच पछाडलं. 100 धावांचा टप्पाही पार केला. पण दिवस संपताना बुमराहने मार्करमप्रमाणेच एल्गारची विकेट घेत भारताला दुसरं यश मिळवून दिल्याने भारताकडे कुठेतरी आशेा किरण आहे खरा. त्यामुळे आता चौथ्या दिवशी आफ्रिकेला विजयासाठी 111 धावा करायच्या असून भारताला 8 विकेट्स मिळवायच्या आहेत.


आतापर्यंतच्या कसोटीचा एक आढावा..


सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 210 धावांवर आटोपल्यानंतर भारताने 13 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात पंतच्या शतकाच्या मदतीने आफ्रिकेला 212 धावांचे आव्हान दिले आहे.


हे देखील वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha