प्रागयाना : वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल या दोघांच्या नावावर एक आगळा-वेगळा पराक्रम जमा झाला आहे.

शिवनारायण आणि तेजनारायण यांनी वेस्ट इंडीजमधल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गयानाकडून अर्धशतकं झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात अर्धशतकं झळकावणारी ही पितापुत्रांची पहिलीच जोडी ठरली आहे.

तेजनारायणने 135 चेंडूंत 58 धावा फटकावल्या तर शिवनारायणनं पाचव्या क्रमांकावर खेळताना 175 चेंडूंत 57 धावा केल्या.

42 वर्षांचा शिवनारायण आणि 20 वर्षीय तेजनारायण याआधी चार सामन्यांत एकत्र खेळले होते. क्रिकेटच्या इतिहासात प्रथम श्रेणी सामन्यांत एकत्र खेळणारी पितापुत्रांची ही 19वी जोडी आहे.