न्यूझीलंडमधील हॅमिल्टनमध्ये खेळवण्यात आलेल्या एका टी-20 सामन्यातील हा प्रकार आहे. ओटागो या संघाचा गोलंदाज वारेन बर्न्सने चक्क हेल्मेट घालून गोलंदाजी केली. बर्न्सने हे हेल्मेट त्याच्या गोलंदाजीच्या स्टाईलमुळे आणि फलंदाजापासून संरक्षणासाठी वापरलं.
हे हेल्मेट स्वतः बर्न्स आणि वोल्सचे प्रशिक्षक रॉब वेल्टर यांनी डिझाईन केलं आहे. बेसबॉलचे अम्पायर आणि सायकलिस्टप्रमाणे हे हेल्मेट आहे. त्यामुळे हे हेल्मेट घालून गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूची जगभरात एकच चर्चा सुरु आहे. गोलंदाजाने हेल्मेट घालण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.
''बर्न्स गोलंदाजी करताना चेंडू फेकल्यानंतर पूर्णपणे समोरच्या बाजूला झुकतो. ज्यामुळे त्याचा डोक्याचा भाग जमिनीच्या दिशेने असतो, जे त्याच्यासाठी धोकादायक आहे. कारण, एखाद्या फलंदाजाने स्ट्रेट ड्राईव्ह मारल्यास बर्न्सला दुखापत होण्याची शक्यता असते. म्हणून तो हेल्मेट घालून गोलंदाजी करतो'', अशी माहिती रॉब वेल्टर यांनी दिली.
पाहा व्हिडिओ :