कोलंबो : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघातील खेळाडूंचं जोरदार कौतुक केलं.
कोहलीने सध्याचा भारतीय संघातील विकेटकीपर फलंदाज रिद्धीमान साहावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. साहा सध्या ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्या ठिकाणी तो त्याची भूमिका उत्तर प्रकारे पार पाडत असल्याचं विराटने म्हटलं.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 2014 साली कसोटीतून निवृत्ती घेतली. तेव्हापासून साहा भारतीय कसोटी संघाचा विकेटकीपर म्हणून भूमिका निभावत आहे.
साहा भविष्यात जगातील सर्वोत्तम खेळाडू असेल. तो सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम विकेटकीपर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याची उत्तम विकेटकीपिंग पाहायला मिळाली. साहा अवघड गोष्टी सोप्या करणारा खेळाडू आहे, असं विराटने सांगितलं.
साहाने भारतीय संघाकडून आतापर्यंत 27 कसोटी सामन्यांमध्ये 33 पेक्षा जास्त सरासरीने 1096 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
विकेटकीपर म्हणूनही साहाने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 52 झेल घेतले आहेत आणि 9 स्टम्पिंग केल्या आहेत. तर दुसरीकडे 9 वन डे मध्येही 17 झेल आणि एक स्टम्पिंग त्याच्या नावावर आहे.
साहा भविष्यातील सर्वोत्तम विकेटकीपर असेल : विराट कोहली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2017 02:46 PM (IST)
भारतीय कसोटी संघात विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंह धोनीची कधीही उणीव न भासू देणारा खेळाडू रिद्धीमान साहावर कर्णधार विराट कोहलीने स्तुतीसुमनं उधळली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -