“मी छत्रपती म्हणून नाही, मी खासदार म्हणून नाही, मी एक सामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.
“मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं आहे. ज्याप्रमाणे राज्यभरात 57 मोर्चे झाले, त्याप्रमाणे मुंबईतील हा 58 वा मोर्चे असेल. हा मोर्चाही शांततेत काढावा, आपला मेसेज जगाला द्यावा, जगाला हेवा वाटेल असा हा शेवटचा मोर्चा काढावा, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी’, असं आवाहन संभाजीराजेंनी शेवटच्या मोर्चाच्या निमित्ताने केलं.
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, यासाठी हा समाज रस्त्यावर आला आहे. हा सकल मराठा समाज आहे. हा समाज एकजूट झालाय हा प्रस्थापितांना संदेश आहे. ज्यांनी ज्यांनी मराठ्यांचा राजकारणासाठी वापर केला त्यांना हा संदेश आहे, असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.
संबंधित बातम्या