सेन्चुरियन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्याच्या कसोटी मानधनाच्या 25 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.


सेन्च्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरू करण्याचा पंचांचा निर्णय विराटला पसंत पडला नव्हता. मैदानातल्या ओलाव्यामुळं चेंडूही ओला होत असल्याचं त्याने पंचांच्या निदर्शनास आणलं होतं.

त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चेंडूवर ग्रिप घेणं कठीण होत असल्याचा विराटचा दावा होता. पण पंचांनी तो मान्य न केल्याच्या रागात भारतीय कर्णधाराने चेंडू जोरात मैदानात आपटला.

या प्रकरणात सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी विराटवर मानधनाच्या 25 टक्के रकमेचा दंड आणि एक दंड गुण अशी कारवाई केली. पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवावा लागला होता.