लंडन : सुप्रसिद्ध सितारवादक पंडित रवीशंकर यांची कन्या, भारतीय वंशाची ब्रिटीश सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट झाला आहे. सात वर्षांच्या संसारानंतर अनुष्का दिग्दर्शक पती जो राईटपासून विभक्त झाली.


2009 मध्ये अनुष्का आणि जो यांची भेट दिल्लीत झाली होती. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा जगभर झाली होती. अनुष्का-जो जगभरात वेगवेगळ्या कॉन्सर्टच्या निमित्ताने भेटत राहिले होते. तीन महिन्यांनी दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

26 सप्टेंबर 2010 रोजी लंडनमध्ये एका खाजगी सोहळ्यात दोघं विवाहबंधनात अडकले. त्यांना जुबिन आणि मोहन ही दोन मुलं आहेत.

अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला, मात्र तिचं बालपण अमेरिका, यूके आणि भारतात गेलं. अनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचं नामांकन मिळालं आहे.

जो राईट यांनी 'प्राईड अँड प्रेज्युडाईस', 'इंडियन समर' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 2008 मध्ये जो राईटची एंगेजमेंट हॉलिवूड अभिनेत्री रोझमंड पिकेशी झाली होती, मात्र काही महिन्यातच दोघं वेगळे झाले.