Virat Kohli:  प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या खेळानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो चर्चेत असतो. क्रिकेटबरोबरच विराट हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात देखील गुंतवणूक करतो. त्याचे काही रेस्टॉरंट देखील आहे. One8 कम्यून या जुहू येथील (Juhu) नव्या रेस्टॉरंटची झलक नुकतीच विराटनं चाहत्यांना दाखवली. हे रेस्टॉरंट प्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या गौरी कुंज या बंगल्यामध्ये बांधण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये विविध चविष्ठ पदार्थांवर खवय्ये ताव मारु शकतात. 


One8 कम्यून या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली हा कॉमेडियन मनीष पॉलला त्याचं जुहूमधील नवं रेस्टॉरंट दाखवताना दिसत आहे. यावेळी विराट कोहली म्हणतो, 'ग्राहकांना या रेस्टोरंटला एकापेक्षा जास्त वेळा भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही या रेस्टॉरंटच्या मेन्यूकडे विशेष लक्ष दिलं आहे. ' या ठिकाणाबद्दल विराट म्हणाला, मी किशोर कुमार यांचा मोठा फॅन आहे. त्यानंतर विराटनं  मेरे महबूब कयामत होगी हे किशोर कुमार यांचं गाणं गायलं. 8 ऑक्टोबर रोजी विराटचं हे नवं रेस्टॉरंट लाँच केलं जाणार आहे. 


पाहा व्हिडीओ: 



विराटच्या One8 कम्यून  या रेस्टॉरंटच्या अनेक शाखा आहेत. या रेस्टॉरंटच्या दिल्ली, कोलकाता आणि पुणे येथे शाखा आहेत. विराटनं इतर व्यवसायांमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्याच्या 'One8' ब्रँडच्या प्रोडक्ट्समध्ये कपडे आणि शूज यांचा देखील समावेश होतो. 


विराटनं इन्स्टाग्रामवर देखील त्याच्या नव्या रेस्टॉरंटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. 'तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तसेच कुटुंबासोबत या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या.', असं विराटनं या व्हिडीओमध्ये चाहत्यांना सांगितलं आहे. 


विराटनं शेअर केला खास व्हिडीओ: 






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: