काल (सोमवार) आयसीसी महिला विश्वचषकातील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं वेस्टइंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पण वेस्टइंडिजची फलंदाजी सुरु असताना पंचांनी एक असा निर्णय दिला की, ज्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
14व्या ओव्हरमध्ये वेस्टइंडिज फलंदाज चेडिन नेशन 2 धावांवर फलंदाजी करत होती. तेव्हा तिनं एक चेंडू स्क्वेअर लेगला मारला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिल्डरनं चेंडू थेट विकेटकीपरकडे फेकला. आणि विकेटकीपरनं बेल्स उडवले देखील. पण मैदानावरील पंच कैथी क्रॉसनं रिप्ले न पाहाता फलंदाजाला नाबाद ठरवलं. त्यानंतर चेडिननं 39 धावा केल्या.
कारण की, सामन्यामध्ये मैदानावरील पंचांशिवाय कुणीही तिसरं पंच नव्हतं. यामुळेच पंच कैथी हिने तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामुळे हा निर्णय पुन्हा बदलता आला नाही.
असं यासाठी झालं की, महिला क्रिकेटमधील सर्वच सामने हे टीव्हीवर प्रसारित केले जात नाही. त्यामुळे जे सामने टीव्ही दाखवले जात नाहीत. त्यामध्ये थर्ड अंपायनर न ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला नसल्याची टीका करण्यात येत आहे.
VIDEO: