वेलिंग्टन (न्यूझीलंड): पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं बांगलादेशचा 131 धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. मंगळवारी हा सामना रंगेल.
भारतानं बांगलादेशला हरवून या विश्वचषकातला सलग चौथा विजय साजरा केला. या सामन्यात भारतानं बांगलादेशला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 134 धावांत आटोपला.
भारताकडून कमलेश नागरकोटीने 3 तर शिवम मावी आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
त्याआधी पृथ्वी शॉनं 40, शुभमन गिलनं 86, हार्विक देसाईनं 34 आणि अभिषेक शर्मानं 50 धावांची खेळी उभारून भारताला सर्व बाद 265 धावांची मजल मारून दिली होती.
भारताचा हा चौथा विजय आहे. भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेवर 10-10 विकेट्स राखून विजय मिळवला, तर आज तब्बल 131 धावांनी बांगलादेशला मात दिली.
दरम्यान, सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पारंपारिक शत्रू पाकिस्तानशी होणार आहे. यंदा पहिल्यांदाच अफगाणिस्तानने आश्चर्यकारकरित्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
संबंधित बातम्या
U19 world cup: भारत उपांत्य फेरीत, झिम्बाब्वेवर मोठा विजय
आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ, कोहली दोन्ही संघाचा कर्णधार
U19 world cup: पीएनजीला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय
पृथ्वी शॉची फलंदाजी पाहून दिग्गजांना सचिन आठवला
146.8 च्या वेगाने गोलंदाजी, अंडर-19 विश्वचषकात नागरकोटीचा विक्रम