नवी दिल्ली: देशभरात आज 69 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील दरवर्षीप्रमाणे राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं, सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणारी परेड होणार आहे.
या परेडचं वैशिष्टय म्हणजे यंदा पहिल्यांदाच भारत-आशियाई संमेलनाच्या निमित्ताने 10 आशियाई राष्ट्रांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत.
सकाळी साडे नऊ वाजता ध्वजारोहणानंतर पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख अमर ज्योतीवर शहिदांना श्रद्धांजली वाहतील आणि 10 वाजता परेडला सुरुवात होईल.
थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई या देशाचे प्रमुख आज उपस्थित राहणार आहेत. यांच्यासमोर भारत राजपथावर आपली ताकद दाखवेल.
संबंधित बातम्या
‘या’ गोष्टींमुळे यंदा राजपथावरची परेड ठरणार खास!
स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कुठे झाली माहितीय का?