World Boxing Championships: टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन (70 किलो), निखत झरीन (52 किलो) आणि पूजा राणी (81 किलो) यांना बुधवारी तीन दिवसांच्या चाचणीनंतर इस्तंबूल येथे होणाऱ्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळालंय. टोकियोमध्ये 69 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्यानंतर लोव्हलिनाची ही पहिलीच स्पर्धा असेल. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) स्पर्धांमध्ये 69 किलो वजनात सामना होत नाही. 


कोरोना महामारीमुळं जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता 6 ते 21 मे या कालावधीत होणार आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी 12 वजनी गटांव्यतिरिक्त, आशियाई खेळांनीही तीन वजन गटांमध्ये (57 किलो, 60 किलो आणि 75 किलो) निवड निश्चित केली. 57 किलोमध्ये मनीषा,60 किलोमध्ये जस्मिनची आणि 75 किलोमध्ये अनुभवी स्वीटी बुराची निवड झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रतिष्ठित स्ट्रॅन्डजा मेमोरियल स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरल्यानंतर झरीनची निवड निश्चित होती. याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीतू (48 किलो) हिनेही जागतिक अजिंक्यपद संघात स्थान मिळवलं आहे. 


महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ:


नीतू (48 किलो), अनामिका (50 किलो), निखत जरीन (52 किलो), शिक्षा (54 किलो), मनीषा (57 किलो), जास्मिन (60 किलो), परवीन (63.5 किलो), अंकुशिता बोरो (66 किलो), लोव्हलिना बोरगोहेन (70 किलो), स्वीटी बुरा (75 किलो), पूजा राणी (81 किलो), नंदिनी (81 किलो)


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha