Best Test bowling figures : आपली जन्मभूमी असणाऱ्या शहरात आपल्याकडून विक्रमी खेळी व्हावी असे अनेक क्रिकेटपटूंना, खेळाडूंना वाटत असते. त्यासाठी अनेकदा त्यांना स्थानिक चाहत्यांचा मोठा पाठिंबा असतो. न्यूझीलंड संघाचा विक्रमवीर गोलंदाज एजाज पटेल याने जन्मभूमी असलेल्या मुंबईत भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाचे 10 फलंदाज बाद केले. आपल्या जन्मभूमीवर एजाज सारखी कामगिरी करण्यापासून आणखी दोन गोलंदाजांची संधी थोडक्यात हुकली.
न्यूझीलंड संघाकडून खेळणारा एजाज पटेल हा मूळचा मुंबईकर त्याने भारताविरोधात जबरदस्त कामगिरी केली. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडीं बाद केले. यात त्याने 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्यात.
क्रिकेटजगतातील महान फिरकीपटूंच्या यादीत असणाऱ्या पाकिस्तानचे अब्दुल कादिर आणि श्रीलंकेचे मुथैय्या मुरलीधन यांनी एकाच डावात 9 गडी बाद केले. या दोन फिरकीपटूंनी ही कामगिरी आपली जन्मभूमी असलेल्या शहरात केली आहे.
मुथैय्या मुरलीधन यांनी झिम्बाब्वे विरोधातील कसोटी सामन्यात 9 गडी बाद केले होते. कँडी येथे जानेवारी 2002 रोजी झालेल्या कसोटी सामन्यात मुरलीधरन ही कामगिरी केली. त्यांनी 51 धावा देत 9 गडी बाद केले. मुरलीधरन हे एकाच डावात 10 गडी बाद करण्याच्या विक्रमाच्याजवळ होते. मात्र, चामिंडा वासने शेवटचा फलंदाज ओलंगा याला बाद केले. वासने घेतलेल्या या बळीमुळे मुरलीधरन विक्रमापासून लांब राहिले.
पाकिस्तानचे महान फिरकीपटू अब्दुल कादिर हे देखील एकाच डावात 10 गडी बाद करण्याच्या विक्रमापासून दूर राहिले. इंग्लंडच्या संघाने 1987 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कादिर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. कादिर यांनी 56 धावा देत 9 गडी बाद केले. तर तौसिफ अहमद यांनी एक गडी बाद केला. तौसिफ यांनी इंग्लंडचा पाचवा गडी बाद केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Anil Kumble on Ajaz Patel : 'वेल कम टू क्लब!' एजाजच्या विक्रमानंतर अनिल कुंबळेंचं ट्वीट
Ajaz Patel : काल स्वप्न पाहिलं आज पूर्ण केलं; एजाजचा वानखेडेवरील 'तो' फोटो व्हायरल!