राफेल नदालने ट्विट केले की, "मी यंदाच्या विम्बल्डन चॅम्पियनशिप आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी अवघड होतं. मात्र, माझ्या शरीराकडे बघून आणि कारकीर्दीला मोठे बनविण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता."
स्टार टेनिसपटू राफेल नदाल जो कि किंग ऑफ रेड ग्रेव्ही म्हणून प्रसिद्ध आहे तो आगामी विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार नाही. त्याने स्वत: एकामागून एक ट्विट करून ही घोषणा केली. तो म्हणाले की हा निर्णय सोपा नव्हता. पण त्याची कारकीर्द मोठी करण्यासाठी हे आवश्यक होते.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरचा टेनिसपटू राफेल नदालने विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्यामागे आपल्या फिटनेसचे कारण सांगितले आहे. वास्तविक, दोन्ही स्पर्धांमध्ये 14 दिवसांचा वेळ ठेवण्यात आला आहे. मातीच्या मैदानावर खेळल्यानंतर रिकव्हर होणे सोपे नाही, असे नदालने सांगितले. त्यामुळे मला खेळणे अशक्य आहे, असे तो म्हणाला.
नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंच ओपन 2021 मध्ये नदालने भाग घेतला होता. पण उपांत्य सामन्यात त्याला नोवाक जोकोविचविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता तो फिटनेसच्या मुद्द्यांमुळे आगामी विम्बल्डन चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेत आहे. आपली व्यावसायिक कारकीर्द मोठी करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
जगातील माजी पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूने पुढे सांगितले की, 'मला वाटते की माझी खेळ कारकीर्द वाढविणे आणि मला आनंदित करणारा खेळ चालू ठेवणे हा योग्य निर्णय आहे.'
सर्बियाचा दिग्गज नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत क्ले कोर्टाचा किंग नदालचा 3-6, 6-3, 7-6, 6-2 असा पराभव केला. साडेचार तास चाललेला हा सामना नोवाक विरुद्ध राफेलचा सर्वोत्कृष्ट सामना होता. या पराभवामुळे नदालने 21 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याची संधी गमावली.