नवी दिल्ली : राम मंदिर संस्थानने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जागेच्या घोटाळ्याप्रकरणी सध्या राजकारण पहायला मिळत आहे. अशात भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना  पावती दाखवा आणि पैसे परत घेण्याचे आवाहन केले आहे. 


भाजपचे खासदार साक्षी महाराज  म्हणाले,  राम मंदिर संस्थानने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीवर आरोप करणारे तेच  लोक आहेत ज्यांनी काही वर्षापूर्वी राम भक्तांवर गोळीबार केला होता.  आज रामचे भव्य मंदिर बांधले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना हे सहन होत नाही. या लोकांचे आरोप निराधार आहे. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी आपले संपूर्ण जीवन भगवान रामसाठी समर्पित केले आहे. 


चंपत राय यांच्यावर आरोप लावणे चुकीचे 


 राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी आपले संपूर्ण जीवन भगवान रामसाठी समर्पित केले आहे. अशा व्यक्तींवर आरोप लावणे चुकीचे आहे. जर तुमच्या संजय सिंहने राम मंदिरासाठी काही दान केले असेल तर ते पावती दाखवून आपली  दानाची रक्कम घेऊ शकतात. अखिलेश यादव देखील आपले दान परत घेऊ शकतात. हे तेच लोक आहेत त्यांनी राम मंदिराला तीव्र विरोध केला.


संजय सिंह यांनी केले होते ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप


आपचे खासदार संजय सिंह यांनी श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. सिंह यांनी लखनौमध्ये दावा केला होता की, ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपयाची जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी केली होती. 


अयोध्येतील राममंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. त्यानंतर आता राममंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) 10 अब्ज रुपये जमा करण्याचा विचार विश्वहिंदू परिषद करत आहे. अयोध्येतील भव्य आणि महत्त्वाकांक्षी राम मंदिराच्या निर्मितीला हा एवढा पैसा उभा करण्याच संकल्प विश्व हिंदू परिषदेचा आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर 1000 वर्ष टिकावे या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे.