Harmanpree kaur on WPL 2023 : हिला प्रीमियर लीग (WPL) 2023 ही महिला क्रिकेटर्सची पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीग यंदा भारतात खेळवली जाणार आहे. यंदा या स्पर्धेचा पहिला हंगाम असल्याने सर्वांनाच या स्पर्धेची उत्सुकता आहे. दरम्यान 4 मार्चपासून सामन्यांना सुरुवात होणार असून भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही मुंबई इंडियन्स संघाची कमान सांभाळत आहे. तिने या स्पर्धेबद्दल बोलताना हा एक अत्यंत चांगला उपक्रम असून यामुळे भारत आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघातील टॅलेंटची दरी भरुन निघणार आहे. म्हणजेच तिच्या मते महिला आयपीएलमुळे भारतीय वुमेन्स क्रिकेट आणखी सुधारेल आणि ऑस्ट्रेलियासारख्या दमदार संघाला भारतीय संघ भविष्यात आणखी तगडी टक्कर देऊ शकतो.


भारतीय संघ महिला क्रिकेटमधील एक दमदार संघ आहे. पण ऑस्ट्रेलियाकडून अनेकदा भारताला महत्त्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या महिला टी20 विश्वचषकात भारत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. त्याआधी कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलमध्येही भारत केवळ 9 धावांनी कांगारुंकडून पराभूत झाला आणि सुवर्णपदक हुकलं. त्याआधी 2020 मध्येही मेलबर्नमध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच भारताला पराभूत केलं होतं. पण आता WPL मध्ये बहुतांश ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडू सहभागी होत असून त्यामुळे भारतातील युवा खेळाडूंनाही संधी मिळेल आणि एका मोठ्या स्टेजवर खेळ केल्याने भारताचा खेळ आणखी सुधारेल असं मत हरमनप्रीतने व्यक्त केलं आहे.


WPL 2023 मध्ये तीन ऑस्ट्रेलियन कर्णधार


जिथे मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळत आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्सची जबाबदारी ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज अॅलिसा हिलीला यूपी वॉरियर्सची कर्णधार बनवण्यात आले आहे. म्हणजेच 5 संघांपैकी तीन संघांचे कर्णधार ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. उर्वरित दोन संघांचे कर्णधार हे फक्त भारतीय खेळाडू आहेत. स्मृती मंधानाला आरसीबीचे कर्णधार बनवण्यात आले आहे आणि हरमनप्रीतकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आहे.


कुठे होणार सामने?


सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.


कुठे पाहाल लाईव्ह सामना?


Viacom-18 ने महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. ज्यामुळे सर्व 22 सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम-18 च्या स्पोर्ट्स चॅनेल 'स्पोर्ट्स-18 1', 'स्पोर्ट्स-18 1एचडी' आणि 'स्पोर्ट्स-18 खेल' या वाहिन्यांवर केले जाईल. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल.


कसं आहे संपूर्ण वेळापत्रक? 


4 मार्च : गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
5 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (3:30 PM, ब्रेबॉर्न)
5 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
6 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
7 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
8 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
9 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
10 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यूपी वॉरियर्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
11 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
12 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (सायं. 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम)
13 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
14 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
15 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
16 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
18 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (3:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
18 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
20 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (3.30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
20 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
21 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स (3:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
21 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
24 मार्च: एलिमिनेटर (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
26 मार्च: अंतिम (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)


हे देखील वाचा-