WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या सत्राचा सलामीचा सामना गुजरात आणि मुंबई यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. तसंच या लीगचा अंतिम सामना 26 मार्च रोजी बेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जाईल. दरम्यान पुरुषांच्या आयपीएलमधील सर्वाधिक वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलमध्येही भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला कर्णधार म्हणून खरेदी केलं आहे. दरम्यान नुकत्याच टी20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पराभवानंतर आता हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्स संघासोबत सामिल झाली आहे. मुंबई इंडियन्स संघाने एक खास व्हिडीओ शेअर करत हरमनप्रीतचं वेलकम केलं आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत हरमनप्रीतच्या एन्ट्रीपूर्वी तिचे सहकारी खेळाडू कोणीतरी खास येत आहे, अशी चर्चा करताना दिसत आहेत. त्यानंतर हरमनप्रीतची एन्ट्री होते. ती मुंबई संघाचं खास जॅकेट घालताना दिसते. तसंच व्हिडीओच्या अखेरीस हरमन आली रे असं मुंबईची भाषा मराठीमध्ये बोलतानाही ती दिसून आली आहे.
पाह VIDEO-
WPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ
धारा गुजर, जिंतीमनी कलिता, प्रियांका बाला, हीदर ग्रॅहम, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नाटे स्क्राइव्हर, सायका इश्के, इसी वोंग, क्लोए ट्रायन, क्लोए ट्रायव्हन, इश्के.
पुरुष संघाप्रमाणे आहे महिलांचीही जर्सी
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रापूर्वी मुंबई इंडियन्सने आपली जर्सी देखील जाहीर केली आहे. मुंबईने एक खास फोटो शेअर करून या जर्सीचे अनावरण केलं आहे. मुंबईची ही जर्सी पुरुष संघाच्या जर्सीसारखीच दिसते. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी फिकट निळ्या रंगाची आहे. त्याच वेळी, जर्सीच्या दोन्ही बाजूंना गुलाबी रंग देखील दिसतो. ही जर्सी मुंबईच्या चाहत्यांना खूप आवडल्याचं त्यांच्या सोशल मीडिया कमेंट्सवरुन दिसत आहे.