नवी दिल्ली : टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना, इंग्लंड दौरा आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे. तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत करुण नायरचंही भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.


दरम्यान, आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणणाऱ्या सिद्धार्थ कौलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे.

एकीकडे अजिंक्य रहाणेवर अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्याचा इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात समावेश करण्यात आलेला नाही. अंबाती रायडू आणि श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेत संधी देण्यात आली आहे.

यंदाच्या आयपीएलने सिद्धार्थ कौल हा नवा खेळाडू भारतीय संघाला दिला आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा करुण नायरही पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करणार आहे.

इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामने

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव

इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव

आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव

अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना

अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, रिद्धीमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर

इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

3 जुलैपासून भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20 सामने आणि तीन वन डे सामने खेळणार आहे.

टी-20 सामने

पहिला टी-20 सामना : 3 जुलै

दुसरा टी-20 सामना : 6 जुलै

तिसरा टी-20 सामना : 8 जुलै

वन डे सामने

पहिला वन डे सामना : 12 जुलै

दुसरा वन डे सामना : 14 जुलै

तिसरा वन डे सामना : 17 जुलै

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.

आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. आयर्लंडमध्ये पहिला सामना 27 जून आणि दुसरा सामना 29 जून रोजी होईल.

अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना

अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होणार आहे. उभय संघांमध्ये हा सामना बंगळुरुत 14 ते 18 जून या काळात खेळवला जाईल.