नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले आहेत. मागील आठवड्यात 12 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आज 7 रुपये किलोने विकला जातो आहे.


कांद्याची आवक चांगली आहे. पण मालाला उठाव नसल्याने कांदा शिल्लक आहे. सध्या कांद्याचा पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी आहे. कांद्याची निर्यात मंदावली आहे, तर दुसरीकडे इतर राज्यातील कांद्याचा पुरवठा देशभर होत असल्याने महाराष्ट्रातील कांद्याची मागणी देशभरातून कमी झाली आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत परराज्यातल्या कांद्याचा पुरवठा कमी झाल्यानंतर राज्यातील कांद्याला चांगले भाव मिळतील, अशी आशा व्यापारी व्यक्त करत आहेत.

एकंदरीत कांद्याच्या सध्याच्या परिस्थितीनुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. किलोमागे 7 रुपये कांद्याच्या भावात शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. उन्हाळी सुट्टीत मुंबईतील लोक गावाकडे जात असल्याने कांद्याच्या विक्रीत घट झाली आहे.