World Cup Match in Theatre Live : क्रिकेटप्रेमींसाठी फार मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आगामी टी20 वर्ल्ड कप मॅच (T20 World Cup) थिएटरमध्ये (Match Live) लाईव्ह पाहता येणार आहे. आयनॉक्स (INOX) या मल्टीप्लेक्स (Multiplex) कंपनीने आयसीसीसोबत करार केला आहे. यामुळे आयनॉक्स (INOX) सिनेमागृहामध्ये तुम्हाला टी 20 विश्वचषकातील सामने लाईव्ह पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. आगामी आयसीसी (ICC) पुरुष T20 विश्वचषक 2022 (ICC Men T20 World Cup 2022) मध्ये भारतात खेळले जाणारे सर्व सामने आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये (INOX Multiplex) लाईव्ह पाहता येतील. देशभरातील आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये वर्ल्ड कपच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येईल.
थिएटरमध्ये पाहा विश्वचषकातील सामने
आयनॉक्स मल्टिप्लेक्स आगामी टी20 पुरुष विश्वचषकात (ICC Men's T20 World Cup 2022) भारत खेळणार असणारे सर्व सामने देशभरातील थिएटरमध्ये लाईव्ह दाखवणार आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. आयनॉक्सने आयसीसीसोबत (ICC) यासाठी करार केला आहे. INOX ने यासंदर्भात माहिती दिली आहे.
आयनॉक्स थिएटरमध्ये मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग
आयनॉक्स थिएटरमध्ये 23 ऑक्टोबरपासूनचे भारताचे टी20 विश्वचषकातील सर्व सामन्यांचं थेट प्रसारण (Live Streaming) करेल. याची सुरुवात 23 ऑक्टोबरपासून होणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारताचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरोधात रंगणार आहे. यानंतर भारताचे विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचं आयनॉक्स थिएटरमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
देशभरातील 25 शहरांमध्ये ही सुविधा
आयनॉक्सनं म्हटलं आहे की, 'INOX टी20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाद्वारे खेळले जाणारे सर्व सामने थिएटरमध्ये दाखवेल. भारतीय संघाचे सर्व लाइव्ह सामने 25 हून अधिक शहरांमधील INOX मल्टिप्लेक्समध्ये दाखवले जातील.' ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकाचं आठव्या सिझनला 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. सुपर 12 किकिंग ऑफ स्टेजची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होईल. टी 20 विश्वचषकातील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे.
INOX Leisure चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद विशाल यांनी सांगितलं की, 'सिनेमांगृहांमध्ये क्रिकेटचे स्क्रीनिंग करून आम्ही आपल्या देशातील सर्वात आवडत्या खेळासोबत मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा अनुभव चाहत्यांना देऊ इच्छितो. मोठ्या पडद्यावर क्रिकेट पाहण्याचा अनुभव क्रिकेटप्रेमींसाठी आनंददायक असेल. मोठा पडडा आणि चाहत्यांचा उत्साह यामुळे एक वेगळा अनुभव मिळेल. किक्रेटप्रेमींसाठी ही एक व्हर्च्युअल ट्रीट असेल.