Sunil Gavaskar Angry On Indian Team Coaching Staff: ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागलाय. सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारुण पराभव करत मालिका खिशात घातली. शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून जिंकला. भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. भारताचे प्रशिक्षक नेमकं काय करत होते? असं म्हणत गावस्कर यांनी एक प्रकारे प्रशिक्षकांना सुनावलंय.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले, " कोचिंग स्टाफ काय करत होता? तुमचा बॉलिंग कोच, बॅटिंग कोच... सर्व प्रशिक्षक काय करत होते? न्यूझीलंडविरुद्ध आपण 46 धावांवर सर्वबाद झालो. त्यानंतर उरलेल्या सामन्यांमध्ये देखील पराभवाला सामोरे जावे लागले. कठीण परिस्थितीत महान फलंदाजांनाही खेळण्यातही अडचणी येतात. मात्र, मैदानावर तेवढी वाईट परिस्थिती नव्हती. आपल्या फलंदाजीत दम नव्हता. त्यामुळे प्रशिक्षकांना प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही केलं तरी काय? सुधारणा का दिसल्या नाहीत?
पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, "अनेक महान फलंदाज देखील चांगली मारा होत असेल तर खेळू शकत नाहीत. ते कारण ठीक आहे, जर चांगला मारा करत असेल तर कोणतीही अडचण नाही. उत्तम बॉलिंग सुरु असल्यानंतर महान खेळाडूंनाही अडचणींचा सामना करावा लागतो. पण जेव्हा ते होत नसेल तर मला सांगा तुम्ही काय केले? भविष्यात आपण विचारू की आपण त्यांना संधी द्यावी का? मी विचारतो की आपण हे देखील विचारले पाहिजे की आपण या कोचिंग स्टाफला पुढे संधी द्यायची का?
इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेबाबत गावस्कर म्हणाले, "आपल्याकडे इंग्लंडला जाण्यासाठी 2-3 महिने आहेत. मी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलत नाहीये. मी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल बोलत आहे. मी कसोटी क्रिकेट जास्त खेळलोय. मला एकदिवसीय क्रिकेटचे फारसे ज्ञान नाही. म्हणूनच मी पण विचारलं, तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांना कसे सुधारू शकता? आपण काय केले ? ज्या खेळाडूंनी धावा केल्या नाहीत त्यांच्याबद्दल प्रश्न जरूर विचारा. कोचिंग स्टाफलाही विचारा"
इतर महत्त्वाच्या बातम्या