Paracin Open A chess tournament 2022 : भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदनं (R Praggnanandhaa) पॅरासिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेच्या गट 'अ' मध्ये (Paracin Open A chess tournament 2022) विजय मिळवला आहे. त्याने एलेक्झांडर प्रेडके याला मागे टाकलं. प्रेडके हा 7.5 अंंकानी दुसऱ्या स्थानावर राहिला. 


16 वर्षीय प्रज्ञानानंद याने (Praggnanandhaa) या स्पर्धेत 8 गुण मिळवत जेतेपद पटकावलं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याला कोणीही मात देऊ शकलं नाही. ज्यानंतर अखेरच्या सामन्यात त्याने आठ गुणांसह विजय मिळवला. यावेळी एलेक्झांडर प्रेडके साडेसात गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून अलीशर सुलेमनोव आणि भारताचा एएल मुथैया सात अंकासह तिसऱ्या स्थानावर राहिले. याआधी प्रज्ञानानंदनं नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांसह नॉर्वेजियन बुद्धिबळ गट अ च्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतही जेतेपद पटकावलं होतं.  






 


प्रज्ञानंद भारतातील सर्वात तरूण ग्रँडमास्टर


प्रज्ञानानंद यांनी वयाच्या 12 वर्षे, 10 महिने आणि 13 दिवसांत ग्रँड मास्टरची पदवी प्राप्त केली. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे. त्याच वेळी, 2018 मध्ये, तो जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. त्याच्या आधी केवळ युक्रेनचा सर्गेई करजाकिन हा 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता.


हे देखील वाचा-