NEET 2022 Exam : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET ची परीक्षा उद्या होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेपूर्वी NTA ने NEET उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटीसद्वारे , NTA ने परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी पाळावयाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती दिली आहे. NTA ने उमेदवारांसाठी neet.nta.nic.in वर NEET UG 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. दुपारी दोन ते सायंकाळी 5 वाजून 20 मिनीटांपर्यंत नीटची परीक्षा होईल.
यूजी नीट (NEET-UG 2022) परीक्षेचे आयोजन ऑफलाईन करण्यात आले आहे. या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा होणार आहे.
मार्गदर्शक तत्त्वे
- परीक्षेला बसणारे उमेदवार कॅज्युअल कपडे घालू शकतात.
- विद्यार्थी चप्पल घालू शकतात. परंतु, विद्यार्थ्यांनी परिक्षेला बसताना बूट घालणे टाळावे.
- परीक्षा केंद्रात पारंपारिक कपडे परिधान करण्यास मनाई आहे.
- परीक्षेच्या वेळेच्या दोन तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
- परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे बायोमेट्रिक्स तपासले जाईल. त्यामुळे त्यांनी हलके कपडे परिधान करून केंद्रावर पोहोचावे जेणेकरून वेळ वाया जाणार नाही.
- परीक्षेसाठी उमेदवारांनी निळ्या किंवा काळा बॉल पेन सोबत बाळगणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी NEET UG 2022 प्रवेशपत्र स्व-घोषणापत्र आणि हमीपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना एक पारदर्शक पाण्याची बाटली आणि हँड सॅनिटायझरची 50 मिलीची बाटली बाळगण्याची परवानगी आहे.
- उमेदवारांना प्रवेशपत्रावर लावण्यासाठी पोस्टकार्ड आकाराचा फोटो किंवा एखादा अतिरिक्त फोटो घेऊन जाण्यास परवानगी आहे.
- धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेच्या वस्तू परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI