नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशीप रौप्य पदकविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची शिफारस 'पद्मभूषण' सन्मानासाठी करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी सिंधूच्या नावाची शिफारस केली आहे.

पी व्ही सिंधूचा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराने गौरव


काहीच दिवसांपूर्वी धोनीच्या नावाची शिफारस बीसीसीआयने 'पद्मभूषण'साठी केली होती. यावर्षी धोनीनंतर 'पद्मभूषण'साठी शिफारस होणारी सिंधू दुसरीच क्रीडापटू ठरली आहे. गेल्या आठवड्यात कोरिया ओपनवर नाव कोरल्यानंतर ही ट्रॉफी पटकावणारी पहिली भारतीय होण्याचा मान तिला मिळाला होता.

'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस


टोकियातील जपान ओपन सुपर सीरीजमध्ये सिंधूचं आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्यानं तिच्या चाहत्यांची घोर निराशा झाली होती. मात्र अवघ्या 22 वर्षांच्या पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये सिंधूला जेतेपद


मार्च 2015 मध्ये सिंधूला पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. रिओ ऑलिम्पिकमधली रौप्यपदक पटकवणाऱ्या पीव्ही सिंधूला स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडचा सर्वोत्तम क्रीडापटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं

बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पी.व्ही.सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप