India vs Australia Test मेलबर्न : दक्षिण आफ्रिकेनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील लढतीसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. अटीतटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानला 2 विकेटनं पराभूत करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे कसोटी सुरु आहे. या कसोटीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अजून फलंदाजी करतोय. पाचव्या दिवशी काय होईल हे सांगता येत नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना रोहित शर्माच्या टीमनं जिंकल्यास किंवा अनिर्णित राहिल्यास भारतासाठी जमेची बाजू ठरेल. सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेनं स्थान निश्चित केल्यानंतर भारत गुणतालिकेत कितव्या स्थानावर आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलिया सध्या गुणतालिकेत भारतापुढं आहे.
दक्षिण आफ्रिकेनं सेंचुरियन कसोटीत पाकिस्तानला पराभूत केलं. त्यांनी पाकिस्तानला 2 विकेटनं पराभूत केलं आणि त्यांचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सध्या दक्षिण आफ्रिका स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी11 कसोटी सामने खेळले असून 7 जिंकल्या असून 3 मध्ये पराभव झाला तर एक अनिर्णीत राहिला आहे. त्यामुळं त्यांच्या गुणांची टक्केवारी 66.67 टक्के इतकी आहे.
गुणतालिकेत भारत कितव्या स्थानावर
ऑस्ट्रेलिया सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 15 सामने खेळले असून 9 सामने जिंकले आहेत. चार सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. याशिवाय 2 सामने अनिर्णीत राहिले होते. ऑस्ट्रेलियाचे गुण 58.89 टक्के असून भारत 55.88 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतानं मेलबर्न कसोटी जिंकल्यास या मध्ये बदल होऊ शकतो.
विजय मिळतात गुण?
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेचे नियम निश्चित आहेत. एखाद्यावेळी एखाद्या संघाला 12 गुण मिळतात. कसोटी टाय झाली तर 6-6 टक्के गुण मिळणातात मॅच अनिर्णीत झाल्यानंतर प्रत्येक संघाला 2-2 गुण मिळतात.
दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं होतं. आता WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्यसाठी भारताला मेलबर्न कसोटी आणि सिडनी कसोटी जिंकावी लागेल, असं झाल्यास भारताचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंति पोहोचू शकतो.
इतर बातम्या :