विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात येणार आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून विंडीजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतलं आव्हान जिवंत राखण्यासाठी टीम इंडियासाठी विशाखापट्टणममध्ये विजयाची नितांत गरज आहे. 288 धावा उभारुनही टीम इंडियाला चेन्नईत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे गोलंदाजांची कामगिरी ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्याच्या अनुपस्थिती टीम इंडियाला चांगलीच जाणवत आहे.


पहिल्या सामन्यात शिमरॉन हेटमायर आणि होपच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकला. आज मालिकेतसा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. भारताला मालिकेतील आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात पराभवसाठी भारताची सुमार गोलंदाजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.


पहिल्या सामन्यात शिमरॉन हेटमायर आणि शाय होपने द्विशतकी भागीदारी करत टीम इंडियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने दिलेले 289 धावांचं आव्हान विंडीजनं 13 चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं होतं. हेटमायरनं 11 चौकार आणि 7 षटकारांसह 139 धावा कुटल्या. होपनेही नाबाद 102 धावांची खेळी उभारली.


पहिल्या सामन्यात दीपक चहर, शिवम दुबे आणि मोहम्मद शमी चांगलं प्रदर्शन करु शकले नव्हते. कुलदीप यादव, रवींद्र जाडेजादेखील कमाल दाखवू शकला नव्हता. त्यामुळे विराट कोहली आडजच्या सामन्यासाठी संघात काही बदल करु शकतो. केदार जाधवलाही संघाबाहेर ठेवलं जावू शकतं. फिल्डिंगदेखील टीम इंडियासाठी सध्या चिंतेचा विषय बनलाय. संपूर्ण वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडियाची ढिसाळ फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने हेटमायरचा कॅच सोडला होता. त्याचा फटका टीम इंडियाला बसला.


पहिला सामना जिंकल्याने वेस्ट इंडिजचा आत्मविश्वास वाढला असेल. 2006 नंतर पहिल्यांदा भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी वेस्ट इंडिजला आहे. त्यामुळे कायरन पोलार्डला मालिक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे आणि त्यासाठी वेस्ट इंडिज प्रयत्नही करेल.