हैदराबाद : वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचल्यानंतर जोरदार प्रतिकार केलेल्या श्रीलंकेनं (Pakistan vs Sri Lanka) आपला फलंदाजीतील तोच धबधबा दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवला. आज (10 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या त्यांच्या दुसऱ्या लढतीत श्रीलंकेच्या कुसल मेंडिस पाकिस्तानचा वेगवान मारा चोपून काढत विक्रमी शतकाची नोंद केली. 


कुसल मेंडिसने अवघ्या 65 चेंडूत शतक ठोकत श्रीलंकेकडून वर्ल्डकपच्या इतिहासात (ICC Cricket World Cup 2023) सर्वात वेगवान शतक करण्याचा मान मिळवला. यापूर्वी श्रीलंकेकडून कुमार संगकाराने 2015 मध्ये 70 चेंडूत शतक ठोकले होते. सलामीवीर कुसल परेरा स्वस्तात बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मेंडिस आणि पाथुम निसंकाने दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. निसंका 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सादेरा समरविक्रमाने सुद्धा कुसल मेंडिसला उत्तम साथ दिली. मेंडिसने वेगवान शेती खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा पहिलाच फलंदाज ठरला. मेंडिस 122 धावा करून बाद झाला. त्याने 122 धावांच्या खेळीत 77 चेंडूचा सामना करताना 14 चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या