PV Sindhu Vs Wang Zhi Yi Head To Head Record: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं शनिवारी जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करून सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या सिंधनं जागतिक क्रमवारीत 38व्या क्रमांकावरील कावाकामीला फक्त 23 मिनिटांत 21-15, 21-7 असं पराभूत केलं. सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधू चीनच्या वांग झि यिशी भिडणार आहे. यापूर्वी पीव्ही सिंधू आणि वांग झि यि यांच्यातील हेड टू हेड रेकार्डवर नजर टाकुयात.


पीव्ही सिंधू आणि वांग झि यि यांच्यातील हेड टू हेड रेकार्ड
पीव्ही सिंधू आणि वांग झि यि यांच्यात आतापर्यंत एकच सामना खेळण्यात आलाय. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दोघ एकमेकांच्या आमने- सामने आले होते. या सामन्यात पीव्ही सिंधूनं वांग झि यिचा 21-18, 21-13 असा पराभव केला होता. 


कधी कुठे रगंणार सामना?
सिंगापूर ओपनच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूचा आशियाई अजिंक्यपद सुवर्णपदक विजेत्या चीनच्या वांग झि यि हिच्याशी सामना होणार आहे.  हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 10.30 वाजता सुरू होईल. पीव्ही सिंधूचा हा सामना स्टार स्पोर्ट्स 18 या चॅनेलवर पाहता येणार आहे. जिओ, टाटा प्ले, एअरटेल डिजीटल प्ले या डिशवर हे चॅनेल उपलब्ध असून वूट या अॅपवरही सामना पाहता येईल. 


उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूचा धडाकेबाज कामगिरी
सिंगापूर ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूनं जपानच्या सेईना कावाकामीविरुद्ध एकहाती विजय मिळवला. चायनीज तैपेईच्या अग्रमानांकित ताय झू यिंगनं दुसऱ्या फेरीत माघार घेतल्यानं कावाकामीला पुढं चाल देण्यात आली होती. सिंधूनं कावाकामीविरुद्धच्या याआधीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले आहेत. 2018 च्या ओपन स्पर्धेत सिंधूचा तिच्याशी अखेरचा सामना झाला होता. 


हे देखील वाचा