Army Dental Corps Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा या ठिकाणी विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात.


जर तुम्हाला भारतीय सैन्य दलात नोकरी (Indian Army) करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भारतीय सैन्य दलात भरतीची संधी चालून आली आहे. भारतीय लष्कराकडून सैन्यात शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत डेंटल पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे सैन्य दलात नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (NEET- MDS 2022) दिलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. भारतीय सैन्य दलाने 15 जुलै रोजी या भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी केली आहे. 


या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवार http://www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जुलैपासून सुरु झाली आहे. 


रिक्त जागांचा तपशील


पुरुष - 27 पदे.
महिला - 3 पदे.


शैक्षणिक पात्रता


या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी डेंटल काउंसिल ऑफ इंडिया (Dental Council of India) मान्यता प्राप्त महाविद्यालयातून किमान 55 टक्के गुणांसह BDS/MDS उत्तीर्ण केलेले असावे. याशिवाय, उमेदवाराने 31 जुलै 2022 पर्यंत DCI द्वारे एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.


तुम्ही अर्ज करू शकता
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (NEET- MDS 2022) दिलेली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जासोबत NEET (MDS)-2022 मार्कशीट/स्कोअर कार्डची प्रत सादर करणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा


या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


महत्त्वाच्या तारखा 


इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अर्जप्रक्रिया सुरु झाल्याची तारीख - 15 जुलै 2022.
इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अर्जाची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022.