Singapore Open Badminton Tournament : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा (Singapore Open 2022) ज्याला सिंगापूर सुपर सीरीज 500 अशा नावानेही ओळखलं जातं ही स्पर्धा नुकतीच सुरु झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षानंतर होणारी ही स्पर्धा यंदा पार पडत आहे. 2020 आणि 2021 सालीचा हंगाम कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आला होता. 12 आणि 13 जुलैपासून या सामन्यांना सुरुवात होणार असून आधी फेरीचे सामने, मग उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे सामने पार पडणार आहेत. 17 जुलैरोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. 


या स्पर्धेत एकेरी फेरीत 88 तर दुहेरी फेरीत 108 बॅडमिंटनपटू सामिल होती. यावेळी भारताकडूनही एकेरी सामन्यात 12 तर दुहेरीमध्ये 8 खेळाडू भाग घेणार आहेत. यावेळी या स्पर्धेत विजय मिळवून पदक मिळवण्यासोबतच आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games 2022) सराव करण्याच्या दृष्टीनेही बॅडमिंटनपटूंसाठी हे सामने महत्त्वाचे असतात. यावेळी भारताकडून पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, सायना नेहवा, किदम्बी श्रीकांत असे आघाडीचे खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्या तीन दिवशीचे म्हणजेच 12,13 आणि 14 जुलै रोजीचे सामने भारतीय टेलिव्हीजनवर पाहता येणार नाहीत. यावेळी बॅडमिंटन चाहते हे सामने BWF च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहेत. 


सिंधू, सायनासह प्रणॉय विजयी


सिंगापूर ओपन स्पर्धा सुरु झाली असून पीव्ही सिंधू (PV Sindhu), सायना नेहवाल (Saina Nehwal) यांच्यासह एचएस प्रणॉयने (HS Pranoy) बुधवारी (13 जुलै) झालेल्या सिंगापूर ओपन 2022 च्या पहिल्या फेरीतील सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह या तिघांनीही दुसऱ्या फेरीच प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांतने मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी सिंधूने जबरदस्त कामगिरी करत बेल्जियमच्या लियान टॅनला 29 मिनिटांच्या सामन्यात 21-15 आणि 21-11 च्या फरकाने मात देत विजय मिळवला.


हे देखील वाचा-