Shubman Gill And Virat Kohli: किंग विराट कोहली आणि प्रिन्स शुभमन गिल (Shubman Gill And Virat Kohli) यांच्यात अनेकदा मैदानात आणि मैदानाबाहेर सुद्धा एकमेकांची मस्करी करण्याचा उद्योग सुरु असतो. किंग कोहली अनेकदा भारतीय सलामीवीर शुभमन गिलसोबत मस्करी करताना दिसतो. मात्र, आता उलटेच दृश्य पाहायला मिळालं आहे. यावेळी गिलने विराट कोहलीला पुरतं गांगरून टाकलं आहे. 


या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली बॅट घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शुबमन गिल व्यायाम करत असताना त्याच्या मागे येतो आणि अचानक किकच्या मुडमध्ये येतो ते पाहून कोहलीला पूर्ण धक्का बसतो. यानंतर, शुबमन गिलला त्याच्या मागे पाहून त्याने बॅट हवेत उचलली. कोहलीला बॅट वर करताना पाहून शुभमन गिल झटपट पळत सुटतो.






विराट कोहलीने या स्पर्धेतील सर्व 9 साखळी सामने खेळले. तर डेंग्यूमुळे शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता आणि नंतर सात सामन्यांचा भाग होता. लीग टप्प्यानंतर कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 9 डावात 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या. त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली. तर शुभमन गिलने 7 डावात 279 धावा केल्या. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली.


दरम्यान,  या विश्वचषकात विराटने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. वानखेडे स्टेडियमवर कोहली न्यूझीलंडला हरवू शकतो. भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने 30 सामन्यांमध्ये 1528 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 5 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. या काळात कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 154 आहे.






उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना 


स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात आयोजित केली जात आहे, ज्या अंतर्गत पहिला उपांत्य सामना क्रमांक 1 आणि 4 क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये होईल. तर दुसरा उपांत्य सामना क्रमांक दोन आणि तीन संघांमध्ये खेळला जाईल.


इतर महत्वाच्या बातम्या