लंडन: महाराष्ट्राचा रणजीवीर श्रीकांत मुंढेनं इंग्लंडमधल्या क्लब क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात दहा विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला आहे. लिव्हरपूल अँड डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये कॉल्विन बे क्लबकडून बर्कनहेड पार्क संघाविरुद्ध खेळताना श्रीकांतनं ही कमाल केली.


 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मान्यता असलेली ही स्थानिक प्रीमियर डिव्हिजन लीग असून, त्यात एकाच डावात दहा विकेट्स काढणारा श्रीकांत पहिला गोलंदाज ठरला आहे. श्रीकांतनं 85 धावांच्या मोबदल्यात दहा विकेट्स काढल्या.

 

बर्कनहेड पार्कला 24 षटकं आणि एका चेंडूत 168 धावांवर रोखण्यात श्रीकांतनं महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीकांतनं मग नाबाद 44 धावांची खेळी करून कॉल्विन बे संघाला मिळवून दिला.