Shooting World Cup: बाकू नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळालं आहे. भारताकडून आशी चौकसी (Ashi Chouksey) आणि स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) यांनी मिश्र 50 मीटर रायफल थ्री पी स्पर्धेत (Mixed 3P Event)   युक्रेनियनचा (Ukranian) 16-12 फरकानं पराभव केलाय. 


नेमबाज स्वप्नील कुसळे आणि आशी चौकसे या भारतीय जोडीनं अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील मिश्र 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलंय. या दोघांनी अंतिम फेरीत युक्रेनच्या सेर्ही कुलिश आणि डारिया तिखोवा यांचा 16-12 असा पराभव केला. बाकू नेमबाजी विश्वचषकात भारताचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं. यापूर्वी इलावेनिल वालारिवन, श्रेया अग्रवाल आणि रमिता या तिघांनी 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक गटात दमदार कामगरीच्या जोरावर भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. 


ट्वीट-



ईलाव्हेनिल व्हालारिवान, रमिता आणि श्रेया अग्रवाल यांनी सुवर्णपदकाच्या लढतीत डेन्मार्कच्या अ‍ॅना निलसन, एमा कूच आणि रिकी माएंग इब्सनचा 17-5 असा पराभव केला. पोलंडला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. माजी अग्रमानांकित व्हालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती.


हे देखील वाचा-


IPL 2022: पाच इनिंगमध्ये तीन वेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला; विराट नव्हे तर, मग तो खेळाडू आहे तरी कोण?


Order of the British Empire: चेन्नईच्या स्टार फलंदाजाला मिळालं'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'चा पुरस्कार


WTC 2023 Final: ठरलं! कधी, कुठे रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना