Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना आज राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आला. तीन वर्षांतील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा  गौरव करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 

राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा  गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षाचे पुरस्कार शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 14 जुलै रोजी जाहीर करण्यात आले होते. आज याचे वितरण झालेय.   2019-20,2020-21 व 2021-22 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ), साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू)  पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले," कै. खाशाबा जाधव हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिन दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. क्रीडा पुरस्काराच्या रकमांमध्ये वाढ करावी ही गेली काही वर्षे मागणी होती त्यानुसार आम्ही जीवनगौरव पुरस्कारासाठी तीन लाख रुपये ऐवजी पाच लाख रुपये तर अन्य क्रीडा पुरस्कारांसाठी एक लाख रुपयाला आयोजित तीन लाख रुपये देण्याचे जाहीर करीत आहोत". महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवावा या दृष्टीने महाराष्ट्राच्या खेळाडूंना आम्ही काही कमी पडून देणार नाही आमचे शासन सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे. 

कोणते आणि किती पुरस्कार देण्यात आले.

       पुरस्काराचे नाव

पुरस्कार संख्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

2

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक

13

जिजामाता पुरस्कार ( क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार )

1

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू )

81

शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार

5

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू)

14

एकूण

116

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

.क्र.

वर्ष

नाव

1

सन 2019-20

श्रीकांत शरदचंद्र वाड, ठाणे

2

सन २०२०-२१

दिलीप बळवंत वेंगसरकर, मुंबई.

3

सन 2021-22

आदिल जहांगिर सुमारीवाला, मुंबई

 उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 2019-20

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक

जिजामाता पुरस्कार

 

खेळ

नाव

 

खेळ

नाव

1

जिम्नॅस्टीक्स

डॉ.आदित्य श्यामसुंदर जोशी, औरंगाबाद

1

सॉफ्टबॉल

दर्शना वासुदेवराव पंडित, नागपूर

2

खो-खो

शिरीन नरसिंह गोडबोले, पुणे

 

3

दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक

संजय रामराव भोसकर, नागपूर

 

थेट पुरस्कार-कबड्डी

प्रशांत परशुराम चव्हाण, ठाणे

 

थेट पुरस्कार-कबड्डी

प्रताप विठ्ठल शेट्टी, ठाणे

 

थेट पुरस्कार-कुस्ती

अमरसिंह निंबाळकर, पुणे

 

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 2020-21

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक

 

खेळ

नाव

1

जिम्नॅस्टीक्स

संजोग शिवराम ढोले, पुणे

2

स्केटींग

राहुल रमेश राणे, पुणे

3

सॉफ्टबॉल

डॉ.अभिजीत इंगोले, अमरावती

4

दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक

विनय मुकूंद साबळे, औरंगाबाद

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 2021-22    

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक

 

खेळ

नाव

1

जिम्नॅस्टीक्स

सिद्धार्थ महेंद्र कदम, औरंगाबाद

2

धनुर्विद्या

चंद्रकांत बाबुराव इलग, बुलढाणा

3

सॉफ्टबॉल

किशोर प्रल्हाद चौधरी, जळगाव

                             

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2019-20

 

.क्र.

खेळाचे नाव

पुरूष

महिला

1

आर्चरी

--

स्नेहल विष्णूमांढरे, सातारा

2

ॲथलेटिक्स

पारस सुनिल पाटील, पुणे

अंकिता सुनिल गोसावी, पुणे

3

आट्यापाट्या

विजयलक्ष्मण न्हावी, जळगाव

शितल मेघराज शिंदे, उस्मानाबाद

4

बॅडमिंटन

--

तन्वी उदयलाड, मुंबई उपनगर

(थेट पुरस्कार )

5

बॉक्सींग

सौरभसुरेश लेणेकर, मुंबई उपनगर

--

6

सायकलिंग

--

प्रणिता प्रफुल्ल सोमण, अहमदनगर

7

तलवारबाजी

जय सुरेश शर्मा, नाशिक

--

8

कबड्डी

--

सायली उदय जाधव, मुंबई उपनगर

9

कयाकिंग-कनॉईंग

सागर दत्तात्रय नागरे, नाशिक

--

10

खोखो

प्रतिक किरणवाईकर, पुणे

आरती अनंतकांबळे, रत्नागिरी

11

मल्लखांब

दिपकवामन शिंदे, मुंबई उपनगर

( थेट पुरस्कार )

प्रतिक्षा लक्ष्मण मोरे, कोल्हापूर

( थेट पुरस्कार )

12

पॉवरलिप्टींग

--

नाजूका तातू घारे, ठाणे

13

शुटींग

--

भक्ती भास्करखामकर, ठाणे

14

स्केटिंग

अरहंत राजेंद्र जोशी, पुणे

श्रुतिका जयकांत सरोदे, पुणे

15

सॉप्टबॉल

अभिजित किसनराव फिरके , अमरावती

हर्षदा रमेश कासार, पुणे

16

स्पोर्टस क्लायबिंग

--

सिध्दी शेखर मणेरीकर, मुंबई उपनगर

17

जलतरण

मिहिर राजेंद्र आंब्रे, पुणे

साध्वी गोपाळधुरी, पुणे

18

डायव्हींग/वॉटरपोलो

--

मेधाली संदिप  रेडकर, मुंबई उपनगर

19

वेटलिप्टींग

--

अश्विनी राजेंद्र मळगे, कोल्हापूर

20

कुस्ती

सोनबा तानाजीगोंगाणे, पुणे

सोनाली महादेव तोडकर, बीड

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2020-21

.क्र.

खेळाचे नाव

पुरूष

महिला

1

आटयापाटया

विशालनिवृत्ती फिरके, जळगाव

शितल बापुराव ओव्हाळ, उस्मानाबाद

2

शुटींग

--

यशिका विश्वजीत शिंदे, मुंबईशहर

.क्र.

खेळाचे नाव

पुरूष

महिला

3

सॉप्टबॉल

--

स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे, कोल्हापूर

4

बेसबॉल

--

रेश्मा शिवाजी पुणेकर, पुणे

5

वुशु

--

मिताली मिलींद वाणी, पुणे

6

सायकलिंग

सुर्या रमेश थटू, पुणे

प्रियांका शिवाजी कारंडे, सांगली

7

अश्वारोहण

अजय अनंत सावंत, पुणे

(थेट पुरस्कार )

--

8

कबड्डी

निलेश तानाजी साळुंके, ठाणे

मीनल उदय जाधव,मुंबई उपनगर

9

खोखो

अक्षय संदीप भांगरे, मुंबई उपनगर

प्रियंका पंढरी भोपी, ठाणे

10

स्केटिंग

अथर्व अतुल कुलकर्णी, पुणे

आदिती संजय धांडे, नागपूर

11

टेबल टेनिस

सिध्देश मुकुंद पांडे, ठाणे

--

12

पॉवरलिप्टींग

--

श्रेया सुनिल बोर्डवेकर, मुंबई शहर

13

कॅरम

अनिल दिलीप मुंढे, पुणे

--

14

जलतरण

--

ऋतुजा भिमाशंकर तळेगावकर, नागपूर

15

कुस्ती

सुरज राजकुमार कोकाटे, पुणे

कोमल भगवान गोळे,पुणे

 

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2021-22

.क्र.

खेळाचे नाव

पुरूष

महिला

1

आर्चरी

मयुर सुधीर रोकडे, सांगली

मोनाली चंद्रहर्ष जाधव, बुलढाणा

2

ॲथलेटिक्स

सर्वेश अनिल कुशारे, नाशिक

--

3

आटयापाटया

अजित मनोहर बुरे, वशिम

वैष्णवी भाऊराव तुमसरे, भंडारा

4

बॅडमिंटन

--

मालविका प्रबोध बनसोड, नागपूर

5

बॉक्सींग

हरिवंश रविंद्र टावरी, अकोला

--

6

बेसबॉल

अक्षय मधुकर आव्हाड, अहमदनगर

मंजुषा अशोक पगार, नाशिक

7

शरिरसौष्ठव

राजेश सुरेश इरले, पुणे

--

8

कनोईंग व कयाकिंग

देवेंद्र शशीकांत सुर्वे, पुणे

--

.क्र.

खेळाचे नाव

पुरूष

महिला

9

बुघ्दीबळ

संकल्प संदिप गुप्ता, नागपूर

थेट पुरस्कार

--

10

सायकलिंग

--

मयुरी धनराज लुटे, भंडारा

11

तलवारबाजी

अभय कृष्णा शिंदे, औरंगाबाद

वैदेही संजय लोहीया, औरंगाबाद

12

लॉन टेनिस

अर्जुन जयंत कढे, पुणे

--

13

जिम्नॅस्टिक -एरोबिक

ऋग्वेद मकरंद जोशी, औरंगाबाद

--

14

खोखो

अक्षय प्रशांत गणपुले, पुणे

अपेक्षा अनिल सुतार, रत्नागिरी

15

पॉवरलिप्टींग

साहिल मंगेश उतेकर, ठाणे

सोनल सुनिल सावंत, कोल्हापूर

16

रोईंग

निलेश धनंजय धोंडगे, नाशिक

--

17

रग्बी

भरत फत्तु चव्हाण, मुंबई शहर

--

18

शुटींग

--

अभिज्ञा अशोक पाटील, कोल्हापूर

19

स्केटिंग

यश विनय चिनावले, पुणे

कस्तुरी दिनेश ताम्हणकर, नागपूर

20

सॉप्टबॉल

सुमेध प्रदिप तळवेलकर, जळगाव

--

21

स्पोर्टस क्लायबिंग

ऋतिक सावळाराम मारणे, पुणे

--

22

जलतरण

--

ज्योती बाजीराव पाटील, मुंबई शहर

23

वेटलिप्टींग

संकेत महादेव सलगर, सांगली

--

24

कुस्ती

हर्षवर्धन मुकेश सदगीर, पुणे

स्वाती संजय शिंदे, कोल्हापूर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०१९-२०

 

पुरुष

महिला

अ.क्र.

खेळ

नाव

अ.क्र.

खेळ

नाव

अ‍ॅथलेटिक्स

योगेश्वर रवींद्र घाटबांधे

अ‍ॅथलेटिक्स

भाग्यरमेश माझिरे

इतर खेळ प्रकार-व्हीलचेअर बास्केटबॉल

मीन बहादूर थापा

इतर खेळ प्रकार - बॅडमिंटन

आरती जानोबा पाटील

 

 

 

3

थेट पुरस्कार - बुद्धीबळ

मृणाली प्रकाश पांडे

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२०-२१

पुरुष

महिला

अ.क्र.

खेळ

नाव

अ.क्र.

खेळ

नाव

जलतरण

दिपक मोहन पाटील

जलतरण

वैष्णवी विनोद जगताप

इतर खेळ प्रकार - व्हील चेअर बास्केटबॉल

सुरेश कुमार कार्की

इतर खेळ प्रकार - पॅरा आर्चरी

मिताली श्रीकांत गायकवाड

                          

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२१-२२

पुरुष

महिला

अ.क्र.

खेळ

नाव

अ.क्र.

खेळ

नाव

अ‍ॅथलेटिक्स

प्रणव प्रशांत देसाई

अ‍ॅथलेटिक्स

आकुताई सिताराम उलभगत

इतर खेळ प्रकार व्हील चेअर बास्केटबॉल

अनिल कुमार काची

इतर खेळ प्रकार - व्हील चेअर तलवारबाजी

अनुराधा पंढरी सोळंकी

 

 

 

3

थेट पुरस्कार-अ‍ॅथलेटिक्स

भाग्यमाधवराव जाधव

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी) सन 2019-20

अ.क्र.

साहस प्रकार

नाव

1

जल

सागर किशोर कांबळे

2

जमीन

कौस्तुभ भालचंद्र राडकर

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी)सन 2020-21

 

अ.क्र.

साहस प्रकार

नाव

1

जमीन

कृष्ण प्रकाश

2

थेट पुरस्कार

केवल हिरेन कक्का - तेनझिंग नॉर्गे पुरस्कार

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी) सन 2021-22

 

अ.क्र.

साहस प्रकार

नाव

1

जमीन

जितेंद्र रामदास गवारे