परभणी : राज्याच्या सत्तेत येताच अजित पवारांचे (Ajit Pawar) दोन्ही मुलं राजकारणात ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांचे पार्थ पवारांचा अचानक परभणी (Parbhani News) दौरा केला आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह परभणीच्या पूर्णेचा दौरा केला आहे. बळीराजा साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरत तिथेच बैठक घेतली . बैठकीत लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. पार्थ पवार यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती मात्र जय पवार राजकारणात सक्रिय नव्हते. आता अजित पवार सत्तेत (Parth pawar and jay pawar) आल्याने वडिलांच्या मागे दोन्ही मुलं राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होऊ पाहत आहेत. पार्थ पवारांनी हेलिकॉप्टरने अचानक परभणीच्या पूर्णेचा दौरा केला. पार्थ पवारांनी अचानक आणि मोजक्याच लोकांसोबत बैठक घेतली. परभणीच्या पूर्णेतील बळीराजा साखर कारखान्यावर बैठक घेतली.
पार्थ पवारांसह सुरज चव्हाण यांची उपस्थिती होती.
2 जुलैला अजित पवारांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्तेत सामील झाले. राज्यात झालेल्या या सत्तानाट्याची जोरदार चर्चा रंगली. पवार कुटुंब भाजपने फोडलं, अशा चर्चा रंगल्या. त्यात अजित पवारांसोबत राज्यातले राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आहेत. त्यामुळे अर्धी राष्ट्रवादी अजित पवारांसोबत आहे. शिवाय गावपातळीवरदेखील अजित पवारांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे गावपातळी किंवा स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील अजित पवारांना समर्थन करत आहे. त्यातच आता दोन्ही मुलंही अजित पवारांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे.
पार्थ पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये
लोकसभेत आपल्या मुलाचा झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. पार्थ पवारांच्या रूपाने पवार घराण्यातील पहिल्याच व्यक्तीला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता याच पराभवाचे उट्टे काढण्यासाठी अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी वेगळे नियोजन केल्याची चर्चा आहे. याचा एक भाग म्हणून पार्थ पवार पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असून त्यांनी अनेकय भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
वडिलांच्या पत्रकार परिषदेत पार्थ पवार आणि जय पवार
अजित पवार भाजपसोबत सामील झाल्यानंतप पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी जय पवार अजित पवारांच्या मागे बसले होते आणि पार्थ पवार बाकी कामगिरी बजावताना दिसले. त्यामुळे येत्या काळात पवार कुटुंबातील हे दोन पुत्र पुन्हा नव्याने राजकारणात सहभागी होणार असल्याचं दिसत आहे.